मित्राच्या रूमवर गेली अन् तिथेच केला आयुष्याचा शेवट! त्या तरुणीसोबत काय घडलं?
Breaking News | Nanded Crime: तरुणीने प्रियकराच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नांदेड: नांदेडमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर, तरुणीने प्रियकराच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शीतल पद्माकर मोरे असं या तरुणीचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी माधव काळेवर गुन्हा दाखल करत त्याला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शीतल मोरे ही अर्धापूर शहरातील रहिवासी असून ती नांदेड शहरात भाड्याने घर घेऊन राहत होती. तिथे ती स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करत होती.
शीतलचे नांदेड शहरातील माधव काळे नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांच्यात मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. संशयित आरोपी माधव काळे हा तिला वारंवार खोलीवर बोलवून त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रविवारी रात्रीही त्याने शीततला घरी बोलवले होते. तिथेही त्याने तिला त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून तिने रात्री 11.30 च्या सुमारास प्रियकराच्याच खोलीत फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी साहेबराव मोरे यांच्या तक्रारीवरुन माधव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पांगरी इथल्या मित्राच्या खोलीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत शीतल मोरे या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर विविध संघटनाच्या आणि नातेवाईक पोलीस ठाण्यात जमा झाले होते. त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी माधव काळेवर गुन्हा दाखल करत त्याला असून त्याला अटक करण्यात आलीय. तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे या तरुणीचे छत्रपती संभाजीनगर इथे पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे.
Breaking News: friend’s room and ended her life there! What happened to that young woman
















































