Home अहिल्यानगर अहिल्यानगर: खंडणीसाठी पुतण्याकडून काकाचे अपहरण, मागत होते दहा लाख रुपये

अहिल्यानगर: खंडणीसाठी पुतण्याकडून काकाचे अपहरण, मागत होते दहा लाख रुपये

Breaking News | Ahilyanagar Crime: पैशासाठी पुतण्यानेच मित्रांच्या मदतीने काकांचे सिनेस्टाईल अपहरण करून त्यांच्याकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. राहुरी येथील घटना : पुण्यातून चार जणांना अटक, फोन करून मागत होते दहा लाख रुपये.

Uncle kidnapped by nephew for ransom, demanding Rs 10 lakh

अहिल्यानगर : काका-पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशासाठी पुतण्यानेच मित्रांच्या मदतीने काकांचे सिनेस्टाईल अपहरण करून त्यांच्याकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्याची तयारी दर्शविल्याने काकाला निर्जनस्थळी सोडून ते पसार झाले. पैशाची मागणी करत ते धमकावत होते. दरम्यान काकांनी पोलिसांशी संपर्क केला आणि पुतण्याचे बिंग फुटले. तपासाची चक्रे फिरवत गुन्हे शाखेच्या पथकाने पुतण्या व त्यांच्या तीन साथीदारांना पुण्यात अटक केली आहे.

बापूसाहेब रामदास गागरे (रा. तांभोरी, ता. राहुरी) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ओम अशोक ठोंबरे (वय २०, हल्ली, रा. कोथरुड, पुणे, मुळ रा. देवगाव, ता. नेवासा), अजय शंकर हुलावळे (रा.

राहुरी येथील व्यापाऱ्यांच्या अपहरण प्रकरणात अटक केलेले आरोपी. कोथरुड, पुणे), सोन्या ऊर्फ आदित्य रावसाहेब गागरे (रा. तांभोरे, ता. राहुरी), साई परमेश्वर ढवळे (रा. भेंडा. ता. नेवासा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते गुरुवारी (दि. १३) त्यांच्या ड्रायव्हरला घेण्यासाठी वाकडी गावाकडे निघाले होते. एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून

आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी निळवंडे कालव्याजवळ फिर्यादीला गाठले. चाकूचा धाक दाखवून त्यांना चारचाकीत बसविले व निर्जनस्थळी नेले. एका गोडावूनमध्ये मारहाण करून दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देतो, असे सांगितल्याने आरोपींनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. चारचाकीत बसवून त्यांना नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांना फोनवरून धमकी दिली. त्यामुळे त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा आदेश दिला. गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली. तांत्रिक विश्लेषणात आरोपींची नावे समोर आली.

जुना नंबर वापरून केला फोन

पोलिसांनी मोबाइल नंबरच्या आधारे शोध घेतला तरी आपण सापडणार नाही, यासाठी आरोपींनी जुन्या नंबरचा वापर केला. जुन्या नंबरवरून त्यांनी फिर्यादीला व्हॉटस्अॅप कॉल केले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांच्या लक्षात आले नाही. जुना नंबर शोधून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.

पुतण्या राहत होता काकांसोबत

आरोपी गागरे हा फिर्यादीचा पुतण्या आहे. फिर्यादी यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे रोकड असायची. पुतण्याला याची माहिती होती. त्याने पैसे कमविण्यासाठी आपल्या काकांचे अपहरण करण्याचा कट रचला. मित्रांच्या मदतीने काकांचे अपहरण केले, असे पोलिस तपासात समोर आले आहे. पुतण्यासह व त्याचा तिघा साथीदारांना अटक करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Breaking News: Uncle kidnapped by nephew for ransom, demanding Rs 10 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here