Home संगमनेर संगमनेरात एमडी अंमली पदार्थाची तस्करी

संगमनेरात एमडी अंमली पदार्थाची तस्करी

Breaking News | Sangamner Crime:  पथकाने ‘एमडी’ या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तरुणास अलिशान वाहनासह पकडले. या कारवाईत ४० लाख रुपयांचे वाहन आणि ३ लाख ९ हजार रुपयांचा १०३ ग्रॅम वजनाचा एमडी पदार्थ असा एकूण ४३ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

drug smuggling

संगमनेर: शहरातील गणेशनगर परिसरात शुक्रवारी (दि. २१) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ‘एमडी’ या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तरुणास अलिशान वाहनासह पकडले. या कारवाईत ४० लाख रुपयांचे वाहन आणि ३ लाख ९ हजार रुपयांचा १०३ ग्रॅम वजनाचा एमडी पदार्थ असा एकूण ४३ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे संगमनेरातील वाढती अंमली पदार्थांची तस्करी चिंताजनक बनली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पगारे, उपविभागीय पो-लीस अधिकारी कार्यालयातील उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पोहेकॉ. अनिल कडलग, दत्त त्रेिय मेंगाळ, पोना. बापूसाहेब हांडे, पोकॉ. राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, शहर पो-लीस ठाण्यातील पोकॉ. विजय खुळे, रामकिसन मुकरे, सुरेश मोरे, कुहे, राहुल क्षीरसागर,

आत्माराम पवार यांचे संयुक्त पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील गणेशनगर परिसरात सापळा लावला. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित अलिशान वाहन (क्र. एमएच.१५ एफएफ. ९६३०) नाशिकच्या दिशेकडून आले. त्यानंतर त्यातील तरुण खाली उतरला आणि पायी चाल ताना इकडे-तिकडे होता. पाहत त्याच्या संशयास्पद हालचालींवरुन पोलिसांनी त्यास पकडले. त्याचे नाव विचारले असता आशिष सुनीलदत्त मेहेरे (वय २८, रा. पुष्पवृष्टी बंगला, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे सांगितले. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता १०३ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ अंमली पदार्थाचा साठा सापडला.

या कारवाईत पोलिसांनी ४० लाख रुपयांचे वाहन आणि ३ लाख ९ हजार रुपयांचे एमडी असा एकूण ४३ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. राहुल सालबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आशिष मेहेर याच्यावर एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ (क) नु-सार गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पुढील तपास पो-लीस उपनिरीक्षक पगारे हे करत आहे.

Breaking News: MD drug smuggling in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here