संगमनेरमध्ये महायुती फुटली! नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माजी नगरसेविकेची बंडखोरी
Breaking News | Sangamner Election: नाराजांची मनधरणी करण्यात काही ठिकाणी यश आले श्रेष्ठींचा आदेश मानत अनेकांनी माघार घेतली. काहींनी आपली नाराजी कायम ठेवत स्वीकृत नगरसेवक पदासाठी दावा ठोकला. तर तर काहींनी मात्र बंडखोरी.

संगमनेर: नगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगमनेरमध्ये महायुती फूटली. काल दुपारनंतर माघार घेण्याचे नाराजी नाट्य आणि बंडखोरीची चर्चा सुरू झाली होती. नाराजांची मनधरणी करण्यात काही ठिकाणी यश आले श्रेष्ठींचा आदेश मानत अनेकांनी माघार घेतली. काहींनी आपली नाराजी कायम ठेवत स्वीकृत नगरसेवक पदासाठी दावा ठोकला. तर तर काहींनी मात्र बंडखोरी केली.
नाराज उमेदवारांनी आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात ते उतरले आहे. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांविषयी थेट ‘पेटी आणि खोक्याची भाषा’ वापरली जात आहे, तर काही निष्ठावान उमेदवारांच्या माघारीवर नागरिकांनी खंतही व्यक्त केली आहे.
अशातच भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांची नगराध्यक्षपदासाठी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. एकूण 43 जणांनी शुक्रवारी माघार घेतली. काहींनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माजी नगरसेविका सुषमा तवरेज यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. त्याही नगराध्यक्षपदाच्या सामन्यात प्रमुख विरोध आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक सदस्यपदासाठी 36 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
संगमनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत. हे उमेदवार कोणाची मते विभागतात, त्यांचा कुणाला फायदा होणार यावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संगमनेरकरमध्ये महापालिकेची निवडणूक चुरशीची होते की एकतर्फी हे 3 डिसेंबरला निकालानंतरच स्पष्ट होईल.
Breaking News: alliance splits in Sangamner! Former BJP corporator rebels for the post of mayor Election


















































