संगमनेर: वाळू वाहतूक करणारी दोन वाहने तालुका पोलिसांनी पकडली
Breaking News | Sangamner: अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा आणि टिप्पर संगमनेर तालुका पोलिसांनी रात्र गस्तीवर असताना पकडला.

संगमनेर: तालुक्यातील चिंचोली गुरव ते वावी रस्त्यावरील भवानी आई मंदिराजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा आणि टिप्पर संगमनेर तालुका पोलिसांनी रात्र गस्तीवर असताना शनिवारी (दि.२२) पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास पकडला.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रात्रगस्तीवर असलेल्या पथकाला चिंचोली गुरव ते वावी रस्त्यावरील भवानी आई मंदिराजवळ वाळूने भरलेला हायवा व टिप्पर दिसला. पथकाने त्यास अडवून चौकशी केली असता हायवा चालक सोमनाथ भाऊसाहेब मोरे (वय ३५, रा. गुरेवाडी, सिन्नर) याने मालक संदीप सोपान शिरसाठ (रा. मुसळगाव) व टिप्पर चालक रवींद्र शिवलाल ढमाले (वय २७, रा. घोटेवाडी, सिन्नर) याने मालक राजेंद्र अण्णासाहेब वेलजाळी (रा. वावी, सिन्नर) यांच्या सांगण्यावरुन कोणतीही परवानगी नसताना वाहतूक करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोकॉ. प्रदीप बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चौघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३ (२) नुसार तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे हे करत आहे.
Breaking News: police seize two vehicles transporting sand


















































