Home पुणे अनैतिक संबंधांमधून भावाकडून भावाची हत्या! भाजी आणायला बाहेर पडला अन्…

अनैतिक संबंधांमधून भावाकडून भावाची हत्या! भाजी आणायला बाहेर पडला अन्…

Breaking News | Pune Crime: चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. पुण्यातील गुजरावाडी येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमागील खरं कारण समोर आलं. अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाचा खून केल्याचं तपासात समोर आलं . (immoral relationship)

Brother kills brother over immoral relationship

Pune Crime: पुण्यात शुक्रवारी (21 नोव्हेंबर) चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. पुण्यातील गुजरावाडी येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमागील खरं कारण समोर आलं आहे.  आपल्याच चुलत भावाची हत्या करुन त्याचा मृतदेह आरोपीने पोत्यात भरला होता. या दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून अशोक पंडित असं आरोपीचं नाव आहे.  आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून अटक केली आहे.  भावाची हत्या करत त्याचा मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता. पावलेला तरुण आणि आरोपी दोघेही चुलत भाऊ मूळचे झारखंडचे रहिवाशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. मात्र या हत्येमागील खरं कारण दुसऱ्या दिवशी समोर आलं आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून अशोक पंडितने चुलत भावाचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अजय गणेश पंडित (वय 22) या तरुणाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. 35 वर्षीय आरोपी अशोक कैलास पंडित हा मूळचा झारखंडमधील मोशीचा रहिवाशी आहे. अशोकला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

दोघेही गेली चार वर्षे पुण्यात मजुरीचे काम करतात. अजय हा कात्रजमधील खोपडेनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होता. अजय हा 17 नोव्हेंबर रोजी रात्री घरातून भाजी आणण्यासाठी गेला होता. परंतु तो अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानंतर या प्रकरणी तपासाची सूत्रे हलली आणि धक्कादायक घटनाक्रम समोर आला. एका महिलेशी अनैतिक संबंधातून अजयचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला अशोकने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्यापुढे अखेर त्याने चुलत भावाचा चाकूने वार करून खून केल्याचं कबूल केलं. गुन्हा लपविण्यासाठी अजयचा मृतदेह कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी भागातील डोंगराळ परिसरात टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेह (Dead body) शोधून काढत ताब्यात घेतला आहे, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Breaking News: Brother kills brother over immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here