अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले
Breaking News | Ahilyanagar: अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली.

अहिल्यानगर: मुकुदनगर परिसरातून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३८ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची अल्पवयीन मुलगी (वय १७) हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांच्या कायदेशीर देखरेखीखालून फुस लावून नेले. ही घटना गुरूवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी ४.१० ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Breaking News: A minor girl was lured away
















































