Home अकोले अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात अपहार

अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात अपहार

Breaking News | Akole Crime:  अकोले पंचायत समितीच्या मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 4 कोटी 14 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात 4 लिपिकांना निलंबित करण्यात आले.

Abuse in the health department of Akole Panchayat Samiti

अकोले:  अकोले पंचायत समितीच्या मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 4 कोटी 14 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात 4 लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, समितीच्या परीक्षणात 3 कोटी 64 लाख 5 हजार 400 रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक भीमाशंकर शशिकांत देशमुख, मंदार श्रावणा पावडे, परिचर यूवराज मारुती डगळे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब रामराव लोंढे यांनी 2 कोटी 25 लाख 91 हजार रुपये अपहार रक्कम न भरल्याने राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पंचायत समितीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 कोटी 14 लाखांचा शासकीय पैशांचा अपहार प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 2017 पासून 2024 पर्यंत कार्यरत असलेल्या 56 आरोग्य कर्मचार्‍यांना नोटीसा बजावत अपहार केलेल्या रक्कम जिल्हा परिषदेकडे भरण्यास सांगितले होते. तर शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहायक मंदार पावडे, मवेशी केंद्रातील कनिष्ठ सहायक भीमाशंकर देशमुख यांनी शासकीय रकमेत अपहार केल्याचे निदर्शनास आल्यावर या दोघांचे जिल्हा परिषद सेवेतून निलंबन करण्यात आले. तसेच घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी संतोष वामन घुले यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले.

Breaking News: Abuse in the health department of Akole Panchayat Samiti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here