अहिल्यानगर: जोरदार कारच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: दोन कारची जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना, माजी सैनिकाचा मृत्यू.
अहिल्यानगरः अहिल्यानगर पुणे महामार्गावर पळवे शिवारात मठ वस्ती नजीक 24 मार्च रोजी दुपारी दोन कारची जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात माजी सैनिक कैलास बेंद्रे (वय 41) जागीच मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली असून अपघातादरम्यान कारमध्ये असलेले तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बेंद्रे हे वाळवणे येथे पत्नीस घेऊन त्यांच्या सासरवाडीत जात होते, तेव्हा हा भीषण अपघात घडला आहे, सोमवारी दुपारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर पळवे खुर्द शिवारात मठ वस्ती नजीक कार (एमएच 12, एसएल 95) व दुसरी कार एम. एच. 02, जीजे 2785) या दोन कारची जोरदार धडक झाली होती. कैलास आबासाहेब बेंद्रे यांची पत्नी अर्चना कैलास बेंद्रे (रा. आंबळे ता. शिरूर) विजय शिंदे (रा. वाळवणे ता. पारनेर) व आणखी एक महिला असे तीन जण अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार अमोल धामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुपे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलीस करत आहेत.
Web Title: Accident Ex-soldier dies in heavy car collision