Home नाशिक गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Breaking News | Nashik Accident: भाविकांच्या वाहनाचा तालुक्यातील नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविक जागीच ठार.

A horrific accident involving a vehicle carrying devotees

इगतपुरी: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा तालुक्यातील नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार भाविक जागीच ठार झाले असून, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नित्यानंद सावंत (वय ६२) विद्या सावंत (वय ६५) विना सावंत (वय ६८) हे तिघेही अंधेरी येथे चार बंगला तसेच चालक दत्ता राम रा. मुंबई हे चौघेही अपघातग्रस्त कारमधील भाविक जागीच ठार झाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या इको वाहनाला सिमेंट पावडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पुढे फरफटत नेल्याने हा अपघात घडला. यावेळी इको वाहनातील चार जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त सर्व अंधेरी मुंबई येथील रहिवासी आहेत.

या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस, महामार्ग पोलीस, टोल नाक्याची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त भाविक मुंढेगावजवळ रामदास बाबा यांच्या मठात गुरुपौर्णिमेसाठी आले होते. यावेळी दर्शन करून निघाल्यावर त्यांच्यावर काळाचा घाला पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Breaking News: A horrific accident involving a vehicle carrying devotees who had come for darshan on the occasion of Guru Purnima; Four died on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here