Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर:  कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: नगर-मनमाड महामार्गावरील पुणतांबा फाटा येथे शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंटेनरखाली चिरडून पादचारी महिलेचा मृत्यू.

Ahilyanagar Accident Woman dies after being crushed under container

कोपरगाव: शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील पुणतांबा फाटा येथे शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंटेनरखाली चिरडून पादचारी महिलेचा मृत्यू झाला.

शनिवारी दुपारी वैजापूरवरून झगडे फाट्याच्या दिशेने कंटेनर (एमएच ४३ सीई ८६९३) जात होता. हा कंटेनर पुणतांबा फाट्याजवळ असताना रुक्साना हसन बागवान (वय ६९, रा. दत्तनगर, कोपरगाव) ही पादचारी महिला रस्ता ओलांडत होती. कंटेनरने रुक्साना बागवान यांना चिरडले. टायरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. कोपरगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि सदर महिलेचा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान कंटेनर चालक नशेत असल्याचे म्हणत स्थानिक नागरिकांनी त्याला चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

खंडाळा – श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर भागात झालेल्या अज्ञात चारचाकी वाहन व दुचाकीच्या अपघातात खंडाळ्यातील नानासाहेब बोरकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला दुखापत झाल्याची घटना घडली.

खंडाळा येथील नानासाहेब दगडू बोरकर व त्यांची पत्नी हे दोघे खंडाळा येथून बेलापूर येथे लग्नासाठी काल टिळकनगरमार्गे दुचाकीवरून निघाले होते. दत्तनगरहून टिळकनगरमार्गे वळाल्यानंतर काही अंतरावरच मागच्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यानंतर चारचाकी वाहनधारक न थांबता घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. अपघातामध्ये नानासाहेब बोरकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला दुखापत झाली.

यावेळी परिसरामध्ये रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे वाहन धारकाला पळून जाणे सोपे झाले. अपघाताचे वृत्त खंडाळा येथे समजताच खंडाळा येथून अनेक तरुण अपघातस्थळी पोहोचले. तोपर्यंत रुग्णवाहिकेतून बोरकर यांना कामगार रुग्णालयामध्ये नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर खंडाळ्यातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

भोकर शिवारात अपघातात श्रीरामपूरचे सुनिल हंगेकर ठार

भोकर: श्रीरामपूर नेवासा रोडवरील भोकर-खोकर शिवारात पिकअप अपघातात श्रीरामपूर येथील संत नामदेव शिंपी समाज पंच मंडळाचे माजी सचिव सुनिल काशिनाथ हंगेकर ठार झाले.

सुनिल हंगेकर हे सकाळी १० वाजेच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भोकर खोकर शिवारात रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून लघुशंका करत असतानाच श्रीरामपूरकडून माळवाडगावकडे भरधाव वेगाने चाललेल्या पिक अपने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा

अपघात घडल्याचे समजताच परीसरातील युवकांनी लागलीच जखमी हंगेकर यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रूग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मयत सुनिल हंगेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली, एक मुलगा, पुतणे, जावई व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ बर्डे हे करत आहेत.

Breaking News: Ahilyanagar Accident Woman dies after being crushed under container

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here