अहिल्यानगर जिल्ह्याला हे दोन दिवस पावसाचे! यलो अलर्ट जारी
Breaking News | Ahilyanagar: काही ठिकाणी धुव्वाधार पावसाला सुरुवात.

अहिल्यानगर: नगर जिल्ह्यात गेल्या दोन महिनापासून दडून बसलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. रविवारी दिवसभर जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. यात कर्जत तालुक्यासह अन्य ठिकाणी धुव्वाधार पाऊस झाला असून जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाच्यावतीने गुरूवार दि. १४ व शुक्रवार दि. १५ रोजी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड झालेला होता. यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन, कपाशीसह जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पिकांना मोठा फटका बसलेला दिसत आहे. मात्र, शनिवारच्या नारळी पौर्णिमेनंतर जिल्ह्यात पुन्हा हळूहळू पावसाला सुरूवात होतांना दिसत आहे. रविवारी कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला असून या पावसाची नोंद ७१ मी.मी. पर्यंत झालेली दिसत आहे. यासह नगर शहर व परिसारात पाऊस झाला असून जामखेड तालुक्यासह दक्षिण जिल्ह्यात रविवारी व सोमवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. दरम्यान, गुरूवार दि.१४ रोजी व शुक्रवारी १५ ऑगस्टला भारतीय हवामान विभागाकडून नगरला पावसाचा यलो अर्लट देण्यात आला आहे.
Breaking News: Ahilyanagar district to witness rain for two days! Yellow alert issued
















































