Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

Breaking News | Ahilyanagar: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.

Ahilyanagar Kidnapping of a minor girl

अहिल्यानगर: नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील घोडकेवाडी परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आले. शुक्रवारी (दि. १३) रात्री ११पासून ते शनिवारी (दि. १४) पहाटे ५पर्यंतच्या दरम्यान राहत्या घरातून पीडित मुलीला पळवून नेल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शनिवारी सायंकाळी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्री ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार शनिवारी पहाटे ५च्या सुमारास लक्षात आला. फिर्यादी यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलिस मुलीचा शोध घेत आहेत.

Breaking News: Ahilyanagar Kidnapping of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here