Home अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीचा फटका, गारपिटीचा तडाखा

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीचा फटका, गारपिटीचा तडाखा

Breaking News | Ahilyanagar Rain: अवकाळीमुळे टोमॅटो, वाटाणा, कोबी पिकांचे नुकसान: नगर तालुक्यातील गुणवडीसह पाथर्डी तालुक्यातील तिसगावलाही फटका.

Ahilyanagar Rain Avakalicha Fatka, Garpiticha Tadakha

पारनेर: पारनेर तालुक्यातील तिखोल, वनकुटे या परिसरात सोमठारी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली. यामुळे टोमॅटो, वाटाणा, कोबी, कलिंगड पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ढ़ाले.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला अथवा चाळीमधील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. टाकली ढोकेश्वर, सुपा परिसरातही विजेच्या कडकडाटासह अतकाळी पावसाने १५ ते २० मिनिटे हजेरी लावली. पावसामुळे मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये थोरचा कालावधीसाठी गारवा निर्माण झाला. गारपिटीसह अवकाळीने शेतात सखल भागात, बांधांमध्ये पाणी साचले होते. एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकविलेला टोमॅटो, वाटाणा, कोबीसह चारा पिकांचे नुकसान झाले हवामान विभागाने जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ में दरम्यान विज्ञांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट जारी केला होता. दरम्यान, श्रीगजरी (दि.५) दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण रोन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होऊन दुधारी ३ ते ४.३० च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा उत्पादक शेतकन्यांची मोठ्या प्रमाणावर धांदल उडाली. हतामान विभागाच्या सुचनेमुळे काही शेतकरी सावध होते.

केडगाव अहिल्यानगर तालुक्यातील दक्षिष्ण भागाला सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गुणवदी भागात गारपीट झाली. शेतक-यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली. उन्हाळी कांदा काढण्याची शेतक-यांची लगबग सुरू आहे. दुपारी तीनच्या सुमारास अचानक अठकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळे शेतात उभद्रचावर पहलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही शेतकन्यांचा कांदा भिजला. तालुक्यातील वाळकी, वडगाव, तांदळी, दहीगात, रुईछतीसी, गुणवडी, खदकी आदी भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे संत्रा, मोसंबी फळबागांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली. दुपारनंतरही नगर तालुक्यात उगाळ वातावरण कायम होते.

पिके पाण्याखाली, लाखोंचे नुकसान…

गुणवडी (ता. अहिल्यानगर) येथे सोमवारी दुपारी गारांचा वर्षाव झाला. गारपिटीमुळे जवळपास १ हेक्टरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

पिकांत पाणी साचल्याने, तसेच गारांचा तडाखाही बसला पिकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावे पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानाप्रमा शेतकरी तिखोलचे सुभाष ठाणगे, वनकुटेते बबनराव काळे यांनी केली आहे.

Breaking News: Ahilyanagar Rain Avakalicha Fatka, Garpiticha Tadakha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here