अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके करोनाबाधित तर ७०४ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर: जिल्ह्यात काल सायंकाळपासून ते आज दुपारी बारा वाजेपर्यंत ८० करोनाबाधितांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत ३७०७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णांत मनपा १८, संगमनेर १०, नगर ग्रामीण २, कॅन्टोनमेंट ३, पारनेर १, अकोले २०, राहुरी १९, शेवगाव ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातील ७०४ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यानुसार मनपा २०२, संगमनेर ७१, राहता ६०, पाथर्डी ४३, नगर ग्रामीण ३५, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट १४, नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११, कोपरगाव ३९, जामखेड १९, कर्जत १७, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या २५४३७ इतकी झाली आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या २९,५९४ इतकी झाली आहे. मृत्यू संख्या ४५० इतकी झाली आहे.
Web Title: Ahmednagar corona update today 12 Sep