अजित दादांचा शिलेदार सापळ्यात अडकला, पोलिसासाठी दीड लाखांची लाच घेताना NCP नेत्याला रंगेहाथ अटक
Breaking News | Ahilyanagar Bribe Case: गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. होती. तडजोडीनंतर दीड लाख रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
अहिल्यानगर : पोलिसासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांना पकडण्यात आले. कोतवाली पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांच्या वतीने गायकवाड यांनी लाच स्वीकारली. गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. होती. तडजोडीनंतर दीड लाख रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
अशोक रामचंद्र गायकवाड, खाजगी इसम, वय 71, व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी व राजेंद्र प्रभाकर गर्गे, वय 57, सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस स्टेशन, अशी आरोपींची नावे आहेत.
सापळा अधिकारी श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी, तपास अधिकारी अजित त्रिपुटे यांच्यासह पोलीस हवालदार विनोद चौधरी,चालक पोलीस हवालदार विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहिल्यानगर मधील एकाला कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गांजाच्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्यासाठी मध्यस्थी करत खाजगी व्यक्ती अशोक रामचंद्र गायकवाड यांनी ही लाच मागितली होती. सुरुवातीला दोघांनी पाच लाख मागितले. नंतर तडजोड झाली व दीड लाख ठरले.
दरम्यान तक्रारदराने नाशिक च्या पथकाकडे संपर्क केला. त्यानुसार सापळा रचण्यात आला. त्यामध्ये 21 ऑगस्टला रात्री गायकवाड यांना ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली.
यात अडकलेले अशोक गायकवाड यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीच्या काळात ते रिपब्लिकन पक्षात होते. मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात त्यांनी काम केले. त्यानंतर स्वतःची संघटना काढली. मधल्या काळात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही काम केले. अजितदादा यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर नगरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात गायकवाड यांचा पुढाकार होता.
Breaking News: Ajit Dada’s Shiledar falls into a trap, NCP leader arrested red-handed while taking a bribe