अजितदादांनी व्यासपिठावरच रोहित पवारांना सुनावलं, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू ……..
Breaking News | Ajit Pawar on Rohit Pawar: २०२४ च्या कर्जत-जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून केलेल्या मदतीची जाहीरपणे आठवण करून दिली.
सांगली: सांगलीतील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार या काका-पुतण्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. अजितदादा आता गावकीकडे लक्ष देत असताना त्यांचं भावकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला. पुतण्याच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी समाचार घेत त्यांना २०२४ च्या कर्जत-जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून केलेल्या मदतीची जाहीरपणे आठवण करून दिली.
कार्यक्रमात भाषण करताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दलबा एक किस्सा सांगत सुरुवातीला त्यांना चिमटा काढला. ते म्हणाले की, पूर्वी अजित पवार माझ्याकडे लक्ष देत होते. मी अधिचेाहनात पहिल्यांदा भाषण केलं होतं तेव्हा माना अजित पवारांचा फोन आला होता. भाषण चांगलं झालं पण तुझ्यावर सगळीकडून कॅमेरे असतात. जरा शर्टचे बटन लाचत जा तेव्हा त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष होतं. पण आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला विसरले आहेत असं विधान केलं होतं. बाला आत्ता अजित पढ़ार यांनी उत्तर दिलं आहे.
त्यावर अजित पवार म्हणाले की, रोहितने बरंच काही सांगितलं. मी ४० लाख देतो. चंद्रकांत दादांनी एक पूज्य बाडवाय. मी एक पूज्य आडवावं, वर बरं झालं सांगितलं नाही दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पून्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील तेवर्द्धच बाकी राहिलं होतं. फार चुरू बुरू चुरु बोलत होता. महटलं गाडी फार फास्ट बालली आहे.
काहींनी बोलताना सांगितल. दादांचं गावकीकडे लक्ष आहे. भावकीकडेही लक्ष द्या. ओ भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव यांना विचारा किती मते पडली पोस्टल बोलेटमध्ये आला आपण असे सांगत आपल्या शैलीत अजित पवारांनी रोहित पवारांच्या टोमण्याला उत्तर दिले, त्यामुळे माझ्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
Breaking News: Ajit Pawar addressed Rohit Pawar on the stage