Home महाराष्ट्र अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या युवा नेत्याची आत्महत्या, कारमध्ये आढळला मृतदेह

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या युवा नेत्याची आत्महत्या, कारमध्ये आढळला मृतदेह

Breaking News | Solapur Crime: विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Ajit Pawar's 'Nationalist' youth leader commits suicide

सोलापूर:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ओंकार हजारे (वय- 32 वर्षे) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ओंकार हजारे हे ‘अण्णा’ नावाने परिचित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (8 जून) रात्री ही घटना घडली. ओंकार यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळून आला. ओंकार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ओंकार हजारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहरातील मुरारजी पेठमधील पापय्या तालीम परिसरात ते राहत होते. रविवारी सकाळपासून कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधाशोध सुरू असताना, सुपर मार्केटजवळ त्यांची कार दिसून आली. कारच्या सीटवर ओंकार बेशुद्ध अवस्थेत बसलेले दिसले. त्यांना आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कारचा दरवाजा तोडण्यात आला. नंतर ओंकार यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मेव्हण्याच्या लग्नाच्या दिवशी टोकाचा निर्णय

ओंकार हजारे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून ओंकार कौटुंबिक कारणांमुळे निराश होते. धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी (रविवारी) त्यांच्या मेव्हण्याचे लग्न होते. परंतु ओंकार यांना मेव्हण्याच्या लग्नाचं निमंत्रण नव्हतं, असेही समजते.

Breaking News: Ajit Pawar’s ‘Nationalist’ youth leader commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here