Breaking News | Akole: आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे पुतळा विटंबना प्रकरण.
अकोले: आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या देवगाव येथील पुतळा विटंबनेचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुतळा विटंबना प्रकरणी दोन ठेकेदारांवर अॅट्रोसिटी गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि.१३) अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी समस्थ बहुजन समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या भारतातील पहिल्या स्मारकाची विटंबना केलेल्या ठेकेदाराच्या निषेधार्थ रा-जूर येथे सकल आदिवासी समाजाच्यावतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी अकोले तालुक्यातील सकल मराठा व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबन प्रकरणी जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. झालेली घटना दुदैवी असून सर्व समाज म्हणून त्या घटनेचा निषेध करतो. परंतु सदर तरुणांवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल
करणे योग्य नसून झालेल्या घटनेचे राजकारण करून बहुजन समाजातील तरुणांचा बळी देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा निषेध म्हणून आज (शनिवारी) अकोले बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, पुतळ्यावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे. पुतळ्याबाबत ग्रामस्थ घेतील तो निर्णय आपणास मान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे स्मारक त्यांच्या गावी देवगाव येथे व्हावे असा माझा मानस होता. पुतळ्याचे राजकारण मला करायचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. देवगाव येथे राघोजी भांगरे यांचे चांगले स्मारक व्हावे ही समाज बांधवांची मागणी होती. त्याप्रमाणे सरकारच्या माध्यमातून एक कोटी रुपये खर्च करून स्मारकाचे काम हाती घेतले आहे. साडेसहा सात फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा तसेच मेघडंबरी तेथे उभारली जाणार आहे. हे काम करत असताना सुरवातीपासूनच अडचणी
येत होत्या. त्यातच हा प्रसंग उद्भवला. काम करणाऱ्यांनी पुतळा हलविताना गावकऱ्यांना बरोबर घेऊन पुतळा हलवून विधीवत त्याची पुनर्स्थापना करायला हवी होती. त्यांनी असे केले नाही ही निश्चितच त्यांची चूक आहे. पण स्मारकाच्या निर्मितीचे काम करणाऱ्यांना आज जेलमध्ये रहावे लागत आहे. चुकले म्हणून त्यांच्यावर काय गुन्हे दाखल करायचे. ज्या हातांनी हे कार्य सुरू होते, त्या दोन बहुजन समाजाच्या मुलांवर अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल करून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू असल्याचा आर- ोप डॉ. लहामटे यांनी केला आहे. याअ- ाधी देखील विनय सावंत, बाजीराव दराडे, माजी मंत्री पिचडांचे पीए. असणारे संतोष सोडनर यांच्यावर या लोकांनी अॅट्रोसिटी दाखल केली होती. समाजात दहशत निर्माण करण्यासाठी अॅट्रोसिटीचा वापर केला जा-तोय. अकोल्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या वेळी आणि छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकास विरोध करणारे देखील लोक हेच होते, असे आरोप त्यांनी कोणाचे नाव न घेता केले आहेत.
Breaking News: Akole is closed today, what is the exact reason?