Home पुणे मी खिशात पैसे घेऊन बसतोय काय? अजित पवारांनी शिवसेना मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावलं

मी खिशात पैसे घेऊन बसतोय काय? अजित पवारांनी शिवसेना मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावलं

Ajit Pawar Speeech: अजित पवार यांनी उत्तर देत भेट नाव न घेता मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावल.

Am I sitting with money in my pocket Ajit Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय कधी व का घेतला? याबाबत देखील अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

तसेच याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना शिंदेच्या काही नेत्यांना देखील अप्रत्यक्ष सुनावल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभागाचा निधी बळवल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी उत्तर देत भेट नाव न घेता मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावल आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“कधी कधी काही बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाहीत. पैसे सोडत नाही, मग मी काय खिशात पैसे घेऊन बसतोय का? शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आम्ही २० टक्के पैसे सोडतो, दुसऱ्या तीन महिन्यांत ४० टक्के सोडतो. तिसऱ्या तीन महिन्यांत ६० टक्के सोडतो, नंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के सोडतो. अशा प्रकारचं ते नियोजन असतं. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. तेव्हाच हे लक्षात आलं की अशाच पद्धतीने अनुसूचित जातीलाही दिलं पाहिजे. कारण आयोग होता पण वैधानिक दर्जा नव्हता. त्यानंतर आज राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Breaking News: Am I sitting with money in my pocket Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here