Home अकोले भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सूनचे जोरदार आगमन

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सूनचे जोरदार आगमन

Breaking News | Akole: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली.

arrival of monsoon in Bhandardara dam catchment

भंडारदरा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला असून दिवसभरात हलक्या ते मध्यम सरी बरसत राहिल्या.

महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं लवकर आगमन झाले असले, तरी भंडारदऱ्याच्या पाणलोटात तो उशिरा पोहोचला. या आधी अवकाळी पावसाने भंडारदरा परिसरात चांगलीच बॅटिंग केली होती. मात्र अखेर सोमवारी मान्सून दाखल झाला आणि परिसरातील ओढे-नाले वाहू लागले. घाटघर येथील उर्ध्व धरण भरून वाहू लागले आहे, तर धरणातून प्रवरा नदीमध्ये ४५० क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण शाखेकडून मिळाली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरण क्षेत्रात पाण्याची नव्याने आवक सुरू झाली आहे. भंडारदरा धरणात सध्या २४४५ दशलक्ष घनफूट (२२.१५ टक्के) पाणीसाठा असून निळवंडे धरणात २५८७ दशलक्ष घनफूट (३१.०६ टक्के) पाणीसाठा आहे. सध्या दोन्ही धरणांमधून कोणताही विसर्ग सुरू नसल्याची माहिती धरण शाखाधिर्कायांनी दिली आहे.

Breaking News: arrival of monsoon in Bhandardara dam catchment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here