Home संगमनेर पगारी कामगार पाठवून हल्ला, मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा’; आमदार खताळांचं थोरातांना चॅलेंज

पगारी कामगार पाठवून हल्ला, मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा’; आमदार खताळांचं थोरातांना चॅलेंज

Breaking News | Sangamner | Amol Thorat on Balasaheb Thorat:  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेत जोरदार टार्गेट केलं.

Attack by sending paid workers, go and show the people

संगमनेर: संगमनेर इथल्या घुलेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संग्रामबापू भंडारे महाराज यांनी राजकीय भाष्य करताना दाखवलेल्या उतावळ्यापणावरून चांगलाच राजकीय वाद उफळला आहे. काही नागरिकांनी महाराजांना भर कीर्तनात अभंगावर निरूपण करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. यावरून कीर्तनात चांगलाच गोंधळ उडाला. यावरून आता संगमनेरमध्ये राजकीय धुरळा उडला आहे.

भाजप हिंदुत्वावादी संघटनांना आज रास्ता रोको आंदोलन पुकारत, त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेत जोरदार टार्गेट केलं. एकप्रकारे चॅलेंजच दिलं. त्यामुळे हा राजकीय धुरळा आगामी काळात उडतच राहणार असल्याचे दिसते.

आमदार खताळ म्हणाले, “जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं, हे तुम्हाला सहन होत नाही. म्हणून पगारी बगलबच्चांना पाठवून हिंदुत्वाचा (Hindu) प्रचार-प्रसार करणाऱ्या संग्रामबापू महाराज भंडारे यांच्यावर, हल्ल्याचा प्रयत्न केला. पण यापुढे असे हल्ले सहन केले जाणार नाही. धर्माविरुद्ध आणि सामान्य जनतेवर जर अन्याय कराल, तर आम्ही अजिबात गप्प बसणार नाही.”

‘तुम्हाला मागेपुढे फिरायला कर्मचारी लागतात. तुम्ही मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा. तुम्ही पुणे, नाशिक आणि मुंबई इकडेच फिरा, तुमची संगमनेरकरांना गरज नाही. तुम्ही धर्म सत्तेला भेदण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर तुम्हाला हिंदुत्ववादी जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरकरांनी तुमचा पराभव केला आहे, तो तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा’, असा सल्लाही आमदार खताळ यांनी थोरातांना दिला.

Breaking News: Attack by sending paid workers, go and show the people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here