Home अकोले ब्रेकिंग! अखेर भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

ब्रेकिंग! अखेर भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

Breaking News | Bhandaradara: अखेर सकाळी  तांत्रिक दृष्टीने भंडारदरा धरण भरले असून निळवंडे धरणात विसर्ग सोडण्यात आला. 

Bhandardara Dam overflows

अकोले: गत दोन दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत. घाटघर आणि रतनवाडीत पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघर येथे 54, रतनवाडीत 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर सकाळी भंडारदरा धरण भरले असून निळवंडे धरणात विसर्ग सोडण्यात आला आहे. पाऊस असाच जोरदार सुरु राहिल्यास प्रवरा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. 

काल मंगळवारी सरी आणखी जोरदार बरसत असल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 158 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते. त्यानंतर काल दिवसभरात 163 दलघफू पाणी आले. त्यामुळे सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात पाणीसाठा 10349 दलघफू (93.75) टक्के झाला होता. रात्री 10 वाजता हा पाणीसाठा 10520 दलघफू (95.23 टक्क्यांवर )पोहचला होता.

मुळा पाणलोटात सोमवारी दुपारपासून पावसाचा काहिसा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा प्रवाह 977 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात 22596 दलघफू पाणीसाठा झाला होता. काल मंगळवारी हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात सरी जोरदार बरसत असल्याने मुळा नदीचा कोतुळ येथील विसर्ग सकाळी 1061 क्युसेक होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 22596 दलघफू झाला होता. सायंकाळी मुळा नदीतील विसर्ग वाढून तो 1753 क्युसेकवर पोहचला होता. तर साठा 22645 दलघफू झाला होता. 

Breaking News: Bhandardara Dam overflows

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here