Home संगमनेर भोजापूर धरण इतके टक्के भरले, ओव्हरफ्लोच्या पाण्यातून…..

भोजापूर धरण इतके टक्के भरले, ओव्हरफ्लोच्या पाण्यातून…..

Breaking News | Bhojapur Dam: ओव्हरफ्लोच्या पाण्यातून तलाव भरावेत- इंजि. चकोर.

Bhojapur dam filled to this percentage, from overflow water

संगमनेर:  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव या दुष्काळी भागासाठी काही अंशी संजीवनी असलेल्या भोजापूर धरणामध्ये आजमितीस सुमारे ८५ टक्के (३०७ द.ल.घ.फु.) इतका उपयुक्त पाणी साठा झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सुरू असलेल्या पाणी आवक या अनुषंगाने हे धरण साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ओव्हर फ्लो होण्याची दाट शक्यता असल्याचे इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी वर्तविली आहे.

धरण लवकरच ओव्हर फ्लो होणार असल्यामुळे सांडव्यावरून वाहून जाणारे पूर पाणी या धरणाच्या लाभक्षेत्रातील संगमनेर व सिन्नर तालुक्यातील पाझर तलाव, गाव तळे, साठवण बंधारे व त्यानुसार ल.पा. तलावांमध्ये सोडण्याची मागणी होत असून, त्या दृष्टीने नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने आवश्यक

ती उपाययोजना करण्याचे देखील मागणी लाभक्षेत्रातून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे जलसंधारण विभागामार्फत निमोण-तळेगाव या दुष्काळी विभागातील गावांमध्ये पूर पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने पूर्ण करण्यात आलेल्या भोजापूर चारीद्वारे ओव्हर फ्लोचे पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे यापूर्वी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच घोषित केलेले आहे. तसेच या कामी संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे देखील प्रयत्नशील आहेत. त्यानुसार नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक व जलसंधारण विभाग, अहिल्यानगरमार्फत कार्यक्षेत्रावर कार्यवाही देखील सुरू आहे. भोजापूर धरण जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो होण्याची शक्यता असल्याने धरणाच्या लाभ क्षेत्रातील व पाण्यापासून वंचित राहिलेल्या लाभक्षेत्रालगतच्या गावातील तलाव भरावेत, अशी मागणी इंजि. चकोर यांनी केली.

Breaking News: Bhojapur dam filled to this percentage, from overflow water

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here