Home संगमनेर संगमनेर: कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Accident: बेदरकारपणे कंटेनर चालवून एका युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Biker killed in collision with container, case registered against container driver

संगमनेर: बेदरकारपणे कंटेनर चालवून एका युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर कोपरगाव रस्त्यावर बेदरकारपणे कंटेनरने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अर्जुन सचिन लोणारी ( 21, रा. जोर्वे, ता. संगमनेर) या युवकाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन लोणारी आपल्या दुचाकी क्र. एम एच १५, ए सी ८८९३) हा युवक तळेगाव महाविद्यालयाकडे जात असताना गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तिगाव परिसरात हा अपघात घडला. समोरील दिशेने येणाऱ्या कंटेनर (क्रमांक एन एल ० १, ए के 2388) वरील चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत अर्जुन लोणारी हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी नंतर त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी संदीप श्रीपत इंगळे (रा. जोर्वे) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक अवनीश कुमार लक्ष्मण सिंग (35 रा. बरहिया बरनलाल, जिल्हा मैनपुरी, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टोपले हे करीत आहेत.

Breaking News: Biker killed in collision with container, case registered against container driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here