Home अकोले मंत्री विखे पाटलांकडून ‘ऑपरेशन लोटस’; झेडपी अध्यक्षपदाचा चेहरा हेरला

मंत्री विखे पाटलांकडून ‘ऑपरेशन लोटस’; झेडपी अध्यक्षपदाचा चेहरा हेरला

Breaking News | Akole:  BJP Mumbai joining event: भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ला अकोले तालुक्यातून सुरूवात केली.

BJP Mumbai joining event Sunita Bhangare

अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिता भांगरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

दरम्यानच्या काळात मंत्री विखे पाटील आणि भांगरे कुटुंबियांमध्ये गाठीभेटी झाल्या होत्या. त्यावरून भांगरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखवी असल्याने भाजपने त्याअनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय गणित आखण्यास सुरुवात केली आहे.

दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरात मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. लवकरच ‘ऑपरेशन लोटस’ होणार असे सूचक वक्तव्य करून एकप्रकारे राजकीय धक्कातंत्राचे संकेत दिले होते.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मध्यस्थीने सुनिता भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची दिवाळीत भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पिचड आणि भांगरे यांच्यात मंत्री विखे पाटील यांनी योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच राजकीय धक्कातंत्राला सुरूवात केली आहे.

मुंबई इथल्या भाजप च्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील काही गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सीताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News: BJP Mumbai joining event Sunita Bhangare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here