Home अहिल्यानगर निलेश लंकेंच्या गडाला हादरे देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन;  ‘या’ नेत्यावर मोठी जबाबदारी

निलेश लंकेंच्या गडाला हादरे देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन;  ‘या’ नेत्यावर मोठी जबाबदारी

Breaking News | Ahilyanagar Election: अहिल्यानगरचं राजकारण फिरवणाऱ्या भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनाच मोठा धक्का देत खासदारकी जिंकून दाखवली. आता याच लंकेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हेरण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू.

BJP's master plan to shake the stronghold of Nilesh Lanke

पारनेर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे येत नीलेश लंके यांनी खासदारकी लढवली. यानंतर शरद पवारांच्या करिष्यामुळे लंकेंनी अहिल्यानगरचं राजकारण फिरवणाऱ्या भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनाच मोठा धक्का देत खासदारकी जिंकून दाखवली. आता याच लंकेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हेरण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरात तब्बल 20 बूथ प्रमुख व 100 मतदारयादी प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त मंडल सरचिटणीस कल्याण थोरात यांनी सांगितले.

पारनेर शहरात सध्या भाजपचे अशोक चेडे एकमेव नगरसेवक आहेत. मात्र, आता पारनेर नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजपने वरिष्ठ पातळीवरून मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील आतापासूनच जोरदार कंबर कसली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यावर आणि नगरपंचायतमध्ये भाजपची ताकद वाढवण्यावर भाजपने भर दिला आहे.

त्याचाच भाग म्हणून मंडलाध्यक्ष राहुल शिंदे यांनी युवा नेतृत्व कल्याण थोरात यांची तालुका मंडल सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. यावेळी मंडल अध्यक्ष राहुल शिंदे, अमोल मैड, सागर मैड, लहू भालेकर, अनिल दिवटे, कल्याण काळे, हर्षवर्धन औटी, धीरज औटी, सौरभ गंधाडे आदी उपस्थित होते.

खासदार लंके यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीवर आरोपांवर भाष्य करताना निवडणूक आयोग गप्प आहे. यातून त्यांची भूमिका काय आहे, ते स्पष्ट होते असा दावा केला होता. तसेच त्यांनी लोकसभेला इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण होते. परंतु मत चोरी झाली. नाहीतर लोकसभेला देखील देशात वेगळे चित्र असते, असा दावा खासदार लंके यांनी केला.

भाजपने मंडल चिटणीसपदाची जबाबदारी माझ्याकडे देऊन काम करण्याची संधी दिली. पारनेरमधील ज्येष्ठ, निष्ठावंत यासह युवकांना बरोबर घेऊन बूथ प्रमुख, मतदार यादी प्रमुख नियुक्ती करण्यात येणार आहे. कल्याण थोरात, मंडल चिटणीस भाजप

भाजपचे पारनेर शहरात एकच नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत पारनेर नगरपंचायतीमध्ये भाजपला आणखी बळकट करण्यासाठी पक्षवाढीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राहुल शिंदे, मंडल अध्यक्ष, पारनेर

Breaking News: BJP’s master plan to shake the stronghold of Nilesh Lanke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here