Home महाराष्ट्र 9 वर्षीय मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला

9 वर्षीय मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला

Breaking News | Solapur Crime: एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना. (Girl Dead body).

Body of 9-year-old girl found buried

सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील धक्कादायक घटना घडली आहे. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाची मंद्रूप पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

या प्रकरणी नातेवाईकांची चौकशी करण्यात येतं असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या की नैसर्गिक मृत्यू हे स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. आज संध्याकाळी 5 च्या सुमारास कुसूर गावाच्या पोलिस पाटलांना गावात एका मुलीचा मृतदेह खड्यात पुरण्यात आल्याची माहिती मिळाली होती.  या माहितीच्या आधारे पोलीस पाटील आणि प्रशासनाने घटनास्थळी जातं पाहणी केली होती.  त्यावेळी घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात एका मुलीचा मृतदेह पुरून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर माहिती समोर येणार आहे. 

रुग्णालयाच्या अहवालत मुलीचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या केली हे समोर येणार आहे.  त्यानंतरच गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल अशी माहिती मंद्रूप पोलिसांनी दिली आहे. 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसात खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कधी घडली? यामध्ये कोण कोण सामील आहे? याबाबतची माहिती घेतली जात आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Breaking News: Body of 9-year-old girl found buried

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here