अकोलेच्या तरूणाचा मृतदेह आढळला, लव्ह चॅट्स’च्या माध्यमातून….
Breaking News | Akole: एका तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोलेतील तरुणाचा खून केल्याचा आरोप तरुणीने विश्वास संपादन करून केला घातपात.
अकोले : उत्तर प्रदेशातील एका तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोलेतील तरुणाचा खून केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
रुपेश रघुनाथ सोनवणे (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. सोनवणे कुटुंब मूळचे खरशिंदे (ता. संगमनेर) येथील असून, काही वर्षे ते धुमाळवाडी (अकोले) येथे राहिले. कामानिमित्त सध्या हे कुटुंब नवी दिल्लीत राहत आहे. गाझियाबाद (नवी दिल्ली) येथे रविवारी (दि. ६ जुलै) रुपेश याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. अकोले येथील बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत रघुनाथ सोनवणे यांनी काही काळ काम केले. त्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय शासकीय केंद्रात नोकरी मिळाली. बुवासाहेब नवले पतसंस्थेचा राजीनामा देऊन ते नवी दिल्लीत कुटुंबासह स्थलांतरित झाले होते. रुपेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. रुपेश पदवीधर होता. रघुनाथ सोनवणे यांनी याबाबत दिल्ली पोलिसांत फिर्याद दिली आहे. नवी दिल्लीतील नोएडा येथील एका कंपनीत १५ दिवसांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. एका तरुणीने ‘लव्ह चॅट्स’च्या माध्यमातून रूपेशबरोबर विश्वास निर्माण करून त्याचा घातपात घडवून आणल्याचा आरोप त्याचे वडील रघुनाथ सोनवणे यांनी केला. या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’ मार्फत करण्याची मागणी त्यांनी दिल्ली येथे केली आहे. रूपेशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
Breaking News: Body of Akole youth found