Home महाराष्ट्र प्रियकराचा प्रेयसीच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकराचा प्रेयसीच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न

Breaking News | Suicide: पार्थिव जळत असताना प्रियकराने दारूच्या नशेत सरणावर उडी मारत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न.

Boyfriend attempts suicide by jumping off girlfriend's bed

कामठी : निराश प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पार्थिवावर कामठी शहरालगतच्या कन्हान नदीतील शांतीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पार्थिव जळत असताना प्रियकराने दारूच्या नशेत सरणावर उडी मारत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला लगेच पकडले आणि चांगलाच चोप दिला. यात तो जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

अंशिका नितीन खोब्रागडे (१९, रा. कन्हान, ता. पारशिवनी) असे मृत प्रेयसीचे, तर अनुराग राजेंद्र मेश्राम (२७कन्हान, ता. पारशिवनी) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दोघेही एकाच भागात राहणारे असल्याने त्यांची आपसात ओळख होती. पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या प्रेमसंबंधात झाले. कुठल्या तरी कारणाने तिला नैराश्य आले आणि तिने रविवारी (दि. ८) सायंकाळी घरातील खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास घेतला. त्यात तिचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे अनुराग उपस्थित होता. त्याने जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी त्याला पकडून बदडले.

Breaking News: Boyfriend attempts suicide by jumping off girlfriend’s bed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here