अहिल्यानगर: बसची दुचाकीला धडक; एक ठार
Breaking News | Ahilyanagar: न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ राज्य परिवहन मंडळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार , राहुरी फॅक्टरी-देवळाली प्रवरा मार्गावरील घटना.
देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरीनजीक श्रीरामपूर रोडवर न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ राज्य परिवहन मंडळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना बुधवारी (दि. ११) सायंकाळी घडली.
अकलूजवरून श्रीरामपूरकडे जाणारी बस (एमएच १४ बीटी ३७४२) व दुचाकी (एमएच १७ डीएफ ७६६५) यांच्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात राहुरी तालुक्यातील कोपरे येथील रहिवासी रामेश्वर कांतीलाल जगताप (वय ४८)
यांना गंभीर मार लागला. वैष्णवी चौक परिसरातील शांताराम मोरे, ठोंबरे, मयूर मोरे, मनोज तांबे, संभाजी शिंदे, सूरज गागरे, बाळासाहेब तांबे यांनी तातडीने जखमी जगताप यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठविले.
रामेश्वर जगताप यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. मयत रामेश्वर जगताप यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
Breaking News: Bus hits bike one killed