Home संगमनेर संगमनेरात मालवाहू ट्रक दुचाकीची धडक, अपघातात युवक जागीच ठार

संगमनेरात मालवाहू ट्रक दुचाकीची धडक, अपघातात युवक जागीच ठार

Breaking News | Sangamner Accident: दुचाकी आणि ट्रकची जोराची धडक होऊन या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू.

Cargo truck hits bike, youth dies on the spot in accident

संगमनेर : कंपनीतून काम करून घरी परतत असताना पुणे नाशिक महामार्गावरील खांडगाव धांदरफळ रोड उडान पुलावर मंगळवार दि 16 रात्री 11:30 च्या सुमारास दुचाकी आणि ट्रकची जोराची धडक होऊन या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव दिनेश राजू लोखंडे वय 33 राहणार संगमनेर खुर्द असे आहे. दिनेश हा मालपाणी कंपनीत कामाला असून कंपनीचे काम करून घरी परतत असताना दुचाकी एम एच 17 एन 2820 तर मालवाहू ट्रक एम एच 14 एल एस 7191 या दोन वाहनांमध्ये जोराची टक्कर होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा गंभीर होता की, दिनेशच्या डोक्याला, हाताला, पायाला सर्व अंगांना गंभीर मार लागून डावा पाय ही तुटला होता. सदरचा ट्रक आमदाबाद वरून पुण्याच्या दिशेने चालला होता.

अपघात बघणाऱ्या पैकी एका व्यक्तीने 112 हा नंबर डायल करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ॲम्बुलन्सही तात्काळ येताच दिनेश यास जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दिनेश लोखंडे यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संगमनेर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

दिनेशच्या पश्चात वडील राजू, आई मनीषा, पत्नी मनीषा, मुलगा महादू आणि मुलगी श्रेया असा परिवार आहे. शहर पोलिसांनी ट्रक चालकास  ताब्यात घेतले असून आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस मीरा बिबवे करीत आहेत.

Breaking News: Cargo truck hits bike, youth dies on the spot in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here