चंद्रकांत पाटील भलतंच बोलून गेले, मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट; म्हणाले
Breaking News | Maratha Reservation: राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण प्रश्नावर आज पंढरपूर इथं भूमिका मांडताना केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला.
पंढरपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरातील मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असताना महाविकास आघाडीसह सत्ताधारी महायुतीतील अनेक नेते आणि आमदार-खासदार या आंदोलनाचं समर्थन करत आहेत. मात्र भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण प्रश्नावर आज पंढरपूर इथं भूमिका मांडताना केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. “आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. मी देवेंद्र फडणवीस यांची महाराजांसोबत तुलना करत नाही, अन्यथा नवीन वाद तयार होईल,” असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. एकीकडे भाजपचेच नेते आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा समाजावर आंदोलनावरून कोणतेही दोषारोप करू नका, असं सांगत असताना चंद्रकांत पाटील यांनी मात्र आंदोलनातून मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“सध्या सुरू असलेले आंदोलन हे मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम आहे. राजकीय आरक्षण मिळवण्याची ही धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. EWS आरक्षण खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. मात्र गावच्या सरपंचपदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या एसईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे,” असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणं अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील. सगेसोयरेबाबत अध्यादेशही निघालेला आहे आणि आपल्या पितृसत्ताक समाजाच्या नियमानुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात आणि अशा सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकाला दाखला मिळतो, त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो, याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे,” असा दावा पाटील यांनी केला आहे.
दरम्यान Maratha Reservation Manoj Jarange : उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन तीव्र, पाणी ही पिणार नाही.
Breaking News: Chandrakant Patil made a mistake, causing a wave of anger among Maratha Reservation