Home संगमनेर संगमनेर: मांजराचे पिल्लू समजून लहान मुलांनी बिबट्याचा बछडा उचलून घेतला अन….

संगमनेर: मांजराचे पिल्लू समजून लहान मुलांनी बिबट्याचा बछडा उचलून घेतला अन….

Breaking News | Sangamner: मांजरी पिल्लू नव्हे, तर चक्क बिबट्याचा छोटा बछडा.

children picked up the leopard cub, mistaking it for a kitten

आश्वी : शेतातील गिनी गवत कापण्यासाठी गेलेल्या दोन मुलांना पायालगत घोटाळणारे पिल्लू आढळले. मांजरीचे पिल्लू आहे, असे त्यांना वाटले, परंतू बराच वेळ त्यांनी, बारिक निरीक्षण केल्यानंतर ते मांजरी पिल्लू नव्हे, तर चक्क बिबट्याचा छोटा बछडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणार्धात भितीने थर-थर कापत मुलांनी तेथून पळ काढला. केवळ नशिब बलवत्तर म्हणून त्यांच्यावरील हल्ला टळला. कारण तेथे योगायोगाने मादी बिबट्या नव्हता! संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर व पानोडीच्या शिवावरील बोंद्रे वस्तीवरील शेतात ही अनोखी घटना घडली.

पानोडी – पिंप्री लौकी अजमपूर या मधल्या रस्त्यालगत शिवाजी मारुती बोंद्रे यांच्या वस्तीशेजारी ओढ्याच्या बाजूला अशोक बोंद्रे यांचे शेत आहे. या घटनेबाबत शिवाजी बोंद्रे यांनी, पत्रकार राजेश गायकवाड यांच्यामार्फत वनाधिकारी राम मंडपे यांना माहिती दिली. घटनास्थळी वनखात्याचे देवीदास चौधरी, सुखदेव सुळ व संजय गागरे या सर्वांनी भेट दिल्यानंतर त्यांना बिबट्याचा छोटा बछडा आढळला. त्या बछड्याला त्यांनी घरापासून दूर सुरक्षित जागी नेवून ठेवले, मात्र रात्री पुन्हा मादी बिबट्या तेथे आला. तिने बछड्याला पुन्हा पहिल्या ठिकाणी नेले. या हालचालींकडे लक्ष्य ठेवून असलेले बोंद्रे यांनी, वन अधिकाऱ्यांना पुन्हा माहिती दिली. वन सहाय्यक मंडपे हे वन कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा छोटा बछडा त्यांना आढळला. तो दीड महिन्याचा आहे, मात्र तेथे आणखी दोन बछड्यांसह मादी बिबट्याचा संचार असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

दरम्यान, गिणी गवतात चक्क बिबट्याचा छोटा बछडा आढळल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News: children picked up the leopard cub, mistaking it for a kitten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here