Home संगमनेर संगमनेर: दोन गटांत हाणामारी! धारदार शस्त्राने हल्ला करून हात धडापासून वेगळा

संगमनेर: दोन गटांत हाणामारी! धारदार शस्त्राने हल्ला करून हात धडापासून वेगळा

Breaking News | Sangamner: धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा हात धडापासून वेगळा करण्यात आला.

Clash between two groups Hand severed from torso after being attacked 

संगमनेर शहरातील नाशिक-पुणे हायवेवरील अमृतेश्वर मंदिरासमोर जुना वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटात आज बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी तुंबळ हाणामारी झाली. यात साई दिलीप वाकुडे (रा. विडी कामगार) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा हात धडापासून वेगळा करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार असून पोलिसांना अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याचा जबाबही नोंदवता आलेला नाही. या घटनेने संगमनेरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर शहरात ड्रग्ज, गांजा, हुक्का आता तर कोयत्याने वार करून हात तोडल्याची घटना समोर आल्याने शहरातील नागरिकांना मन सुन्न करणाऱ्या घटना एक-एक समोर येत आहे.

संगमनेर शहरातील नाशिक पुणे हायवेवरील अमृतेश्वर मंदिरासमोरील परिसरात जुनावाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन एका तरुणाने धार-धार शस्राने वार करून हातच धडापासुन वेगळा केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अमृतेश्वर मंदिर परिसरात घडली. यामध्ये साई दिलीप वाकुडे (रा. विडी कामगार, ता. संगमनेर) या तरुणाचा हात पूर्ण छाटल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. तो गंभीर जखमी असल्याने नाशिक येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना घडताच आरोपी फरार झाले. असुन पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. तर साई वाकुडे हा अत्यावस्थेत असल्याने अद्याप त्याने जबाब दिलेला नाही. त्यामुळे, पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नाही. परंतु, या घटनेने संपूर्ण संगमनेर शहर हादरून गेले आहे. कारण, हा वार धार-धार कोयत्याने केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Breaking News: Clash between two groups Hand severed from torso after being attacked 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here