Home अकोले अकोलेत १२वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अकोलेत १२वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Akole Suicide: इयत्ता १२ वीतील १७ वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या घरातील वरच्या मजल्यावरील छताच्या पत्र्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या.

Class 12th student commits suicide by hanging in Akole

अकोले: तालुक्यातील बेलापूर येथील इयत्ता १२ वीतील १७ वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या घरातील वरच्या मजल्यावरील छताच्या पत्र्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम रूपेश फाफाळे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बेलापूर गावात किसन गणपत फापाळे है पत्नी सिंधुबाई समवेत शेतीसह विविध कार्यक्रमांतून स्वयंपाक बनवण्याचे काम करतात. त्यांना रुपेश व दीपक दोन मुले आहेत. नोकरी व्यवसायाचे निमित्ताने दोघे पुणे येथे वास्तव्यास – आहेत. पैकी रुपेश यांचा एक मुलगा – शुभम हा शालेय शिक्षणासाठी बेलापूर येथील आजोबा व – आजीकडे राहतो. बुधवारी (२३ – एप्रिल) रात्री शुभम वरच्या – मजल्यावरील छताच्या पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. – सकाळी दरवाजा न उघडल्याने घाबरून बेलापूर ग्रामस्थांना मदतीस बोलावून दरवाजा तोडला. घरातील छताच्या पत्र्यास दोरीने गळफास घेऊन शुभम मृतावस्थेत दिसून आला. ही घटना गुरुवारी उघडकीस – आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Breaking News: Class 12th student commits suicide by hanging in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here