पावसाचा दणका! ढगफुटी, शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं, नदी नाल्यांना पूर
Solapur Sangola Rain : पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. यामुळं शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान.

सांगोला: राज्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. यामुळं शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं चित्र दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात देखील ढगफुटी झाली आहे. या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.
दुष्काळी सांगोल्याला ढगफुटीचा मोठा दणका बसला आहे. एका रात्रीत 170 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर शेकडो घरात पाणी शिरले आहे. कायम दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या आणि पाण्याच्या टँकरवर सहा महिने काढणाऱ्या सांगोला तालुक्याला काल रात्री ढगफुटीने मोठा दणका दिला असून पुढे नाले कडलास जवळा आणि सोनंद या तीन सर्कल मधील अनेक गावांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कडलास वाटंबरे खटकाळेवाडी अशा अनेक गावातील लोकांचे सामान पावसात वाहून गेलेले असून ग्रामस्थ असाह्य बनले आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतातील खरीप व रब्बी पिकांना याचा फार मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात पिकांची मोठी हानी झाली आहे. अतिवृष्टीचा सर्वच जिल्ह्यांना फटका बसत असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. याबाबत आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
Breaking News: Cloudburst, water entered hundreds of houses, rivers and canals flooded
















































