Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कॉलेज तरुणीवर अत्याचार

अहिल्यानगर: कॉलेज तरुणीवर अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: गोड बोलून तिच्यासोबत मोबाइलवर फोटो काढले. त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार.

College girl abused ahilyanagar

राहुरी : पाच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीला ‘तू मला खूप आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे,’ असे गोड बोलून तिच्यासोबत मोबाइलवर फोटो काढले. त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित तरुणी राहुरी शहर हद्दीत राहत असून, ती १२ वीच्या वर्गात शिक्षण घेते. तिची एप्रिल २०२५ मध्ये यश डौले याच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे सुरु झाले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. २८ जुलै २०२५ रोजी ती तरुणी दुपारी १२ वाजता कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी बसस्थानकासमोरील हायवे रोडवर उभी असताना तेथे आरोपी घेऊन गेला. त्याने तरुणीला लॉजवर नेले व तेथे अत्याचार केला. घरी आल्यानंतर पीडित तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तरुणीने नातेवाइकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डौले (रा. जोगेश्वर आखाडा, ता. राहुरी) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४, ८, १२, मारहाण, विनयभंग तसेच अत्याचापाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Breaking News: College girl abused ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here