Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कॉलेज तरुणीला बाईकने रूमवर नेलं, नंतर आवाज ऐकून शेजारी हादरले

अहिल्यानगर: कॉलेज तरुणीला बाईकने रूमवर नेलं, नंतर आवाज ऐकून शेजारी हादरले

Breaking News | Ahilyanagar Crime: 16 वर्षीय मुलीवर निर्दयीपणे चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना.

College girl taken to room by bike, neighbors shocked 

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये 16 वर्षीय मुलीवर निर्दयीपणे चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिस्तबाग महाल परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. दरवाजा लाथ मारून उघडण्यात आल्याने पीडित मुलगी थोडक्यात बचावली. याप्रकरणी आरोपी महेश माणिक भेटे (रा. ढवणवस्ती, सावेडी) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सचिन लक्ष्मण पोटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून शनिवारी 11 वाजता त्यांच्या घरामागील खोलीतून आरडाओरड होत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले असता महेश भेटे हा आपल्या रूममध्ये एका मुलीच्या अंगावर बसून हातातील धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे दृश्य पाहून शेजारी राहणारे नागरिकही भयभीत झाले.

फिर्यादी सचिन पोटे यांनी तत्काळ रूममालकाला फोन केला आणि दोघांनी मिळून दरवाजा लाथ मारून उघडला. त्यानंतर जखमी मुलगी रक्तस्त्राव होत असताना बाहेर आली आणि हातवारे करत रस्त्याकडे धावली. तिच्या मागे चाकू हातात घेऊन महेश भेटे हाही धावत आला. सुदैवाने नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप केला आणि अल्पवयीन मुलीचा जीव वाचवला.

सदर मुलगी अकरावी इयत्तेत शिकत असून ती घटनेपूर्वी आरोपीसोबत दुचाकीवरून रूमवर गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. रूममध्ये गेल्यानंतर त्यांच्यात नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु काही वेळातच आरोपी भेटे याने चाकूने मुलीच्या गळ्यावर सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोपी महेश भेटे हा यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात अटकेत होता आणि सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. जामिनावर असतानाच त्याने अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Breaking News: College girl taken to room by bike, neighbors shocked 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here