Home अहिल्यानगर अहिल्यानगर: चुलत दिराचा भावजयीवर अत्याचार

अहिल्यानगर: चुलत दिराचा भावजयीवर अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे आणि पतीला मारण्याची किंवा स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देऊन पीडितेला गप्प ठेऊन अत्याचार.

Cousin's brother-in-law's abused

पाथर्डी: तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिलेने तिच्या चुलत दीराविरुद्ध अत्याचार आणि धमकीची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे आणि पतीला मारण्याची किंवा स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देऊन पीडितेला गप्प ठेवल्याचे तसेच ऑगस्ट २०२४ पासून मे २०२५ पर्यंत वारंवार अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने अखेर पतीसोबत पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली.

याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला ही घरकाम आणि शेती करणारी असून आरोपी हा पीडित महिलेच्या पतीच्या चुलत काकांचा मुलगा आहे, म्हणजेच महिलेचा चुलत दीर. दोघांची घरे शेजारी असल्याने नेहमी बोलणे आणि येणे-जाणे असायचे. ऑगस्ट २०२४ मध्ये एका संध्याकाळी महिला शेतात एकटी काम करत असताना आरोपी तेथे आला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ही घटना कोणाला सांगितली तर पतीला मारून टाकेन किंवा स्वतः आत्महत्या करेन अशी धमकी देऊन तो निघून गेला. भीतीपोटी महिलेने कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर आरोपीने वारंवार संधी साधून घरी किंवा शेतात महिलेवर जबरदस्ती केली. प्रत्येक वेळी धमकी देऊन तिला गप्प ठेवले. अखेर महिलेला त्रास असह्य झाल्याने तिने पतीला सर्व सांगितले. पतीने आरोपीला समजावले असता, त्याने यापुढे त्रास देणार नाही असे सांगितले. मात्र, मे २०२५ मध्ये पती बाहेरगावी गेल्यावर आरोपीने पुन्हा शेतात जाऊन महिलेवर जबरदस्ती केली आणि धमक्या दिल्या. आरोपी सतत महिलेवर नजर ठेवून राहत असल्याने आणि धमक्या देत असल्याने तिला जीवाची भीती वाटू लागली. अखेर ९ ऑगस्ट रोजी महिलेला पतीसोबत पोलिस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून, तपास सुरू आहे.

Breaking News: Cousin’s brother-in-law’s abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here