तुला प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला…; महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या टीम लीडरवर गुन्हा
Breaking News | Pune Crime: तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील वर्तन करणार्या टीम लिडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल.
पुणे : महिलेला स्वतःच्या कारमध्ये बसवून तिला तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील वर्तन करणार्या टीम लिडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत रिठे (रा. ससाणेनगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी येथील एका आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये ३ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत रिठे हे एकाच आय टी कंपनीत कामाला आहेत. अनिकेत रिठे हा टीम लीडर आहे. कंपनीत असताना पहाटे तीनच्या सुमारास अनिकेत रिठे याने फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून कंपनीचे पार्किंगमध्ये स्वतःच्या कारमध्ये बसवले. तुझे प्रमोशन करतो व तुझा पगार वाढवतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता, त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्याबरोबर अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख करत आहेत.
Breaking News: Crime against team leader for lewd behavior with woman