अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा, शोमध्ये भूमिका देण्याचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचार
Breaking News | Rape Case: लग्न तसेच त्याच्या ‘हाउस अरेस्ट’ शोमध्ये भूमिका देण्याचे प्रलोभन दाखवून अभिनेता एजाज खान याने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिली.
मुंबई : लग्न तसेच त्याच्या ‘हाउस अरेस्ट’ शोमध्ये भूमिका देण्याचे प्रलोभन दाखवून अभिनेता एजाज खान याने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिली आहे. त्यानुसार चारकोप पोलिस ठाण्यात
महिलेच्या म्हणण्यानुसार, खानने तिला त्याच्या ‘हाउस अरेस्ट’ शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका देण्यासाठी फोन केला होता. शूटिंगदरम्यान, त्याने प्रथम तिला प्रपोज केले आणि नंतर तिच्या घरी जाऊन त्याने बलात्कार केला.
एजाज खानवर महिलेचे गंभीर आरोप – महिलेनं दिलेल्या तक्रारीमध्ये एजाज खाननं तिला लग्नाचं आणि वेब शोमध्ये भूमिका देण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी या महिलेला त्यानं उल्लू अॅपवर प्रसारित होणाऱ्या त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. शूटिंग दरम्यान, एजाजनं तिला प्रपोज केलं आणि नंतर तिनं धर्म स्वीकारल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. तक्रारीत असाही आरोप आहे की एजाज खाननं तिला त्याच्या घरी बोलावलं आणि तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
एजाज खानवर पोलिसांनी लावलेली कलमं – महिलेच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी एजाज खानवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४, ६४(२)(M), ६९ आणि ७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एजाज खानच्या शोवर बंदी घालण्याची मागणी – अलीकडच्या काळात एजाज खान वादात सापडला आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी सुरू झालेल्या ‘हाऊस अरेस्ट’ या त्याच्या शोवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील काही गटांकडून जोरदार टीका झाली आहे. त्याचा शो अश्लील असल्याचा दावा करण्यात आला असून सरकारनं त्याच्या शोवर बंदी घालण्याची आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Breaking News: crime of raping an actor, luring him with a role in a show, sexual harassment