Home औरंगाबाद “क्राइम पेट्रोल” बघून पुतण्यांनी चुलत्याचं मुंडकं उडवलं, रचला हत्येचा कट, पोलीसही चक्रावले...

“क्राइम पेट्रोल” बघून पुतण्यांनी चुलत्याचं मुंडकं उडवलं, रचला हत्येचा कट, पोलीसही चक्रावले  

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: निवृत्त न्यायालयीन लिपीकाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ. जमिनीच्या लालसेपोटी आणि जुन्या वैमनस्यातून त्यांच्याच पुतण्यांनी हे घृणास्पद कृत्य केलं.

Crime Patrol Baghoon Putnyani Chulatyachan murder case.jpeg

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील चिंचोळा गावातून एक धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे. निवृत्त न्यायालयीन लिपीकाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी कसून तपास केल्यावर या हत्येमागचं विदारक सत्य उघड झालं आहे. जमिनीच्या लालसेपोटी आणि जुन्या वैमनस्यातून त्यांच्याच पुतण्यांनी हे घृणास्पद कृत्य केलं होतं. विशेष म्हणजे, या भीषण गुन्ह्याची प्रेरणा ‘क्राइम पेट्रोल’ या लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेमधून मिळाली, हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत व्यक्ती नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस (वय 60) हे होते. ते मूळचे चिंचोळ्याचे रहिवासी असून बीड जिल्ह्यातील गेवराई न्यायालयात लिपीक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या गावी परतले होते. चिंचोळ्याच्या शिवारात त्यांची गट क्रमांक १२१ मध्ये शेती आहे. ६ जून रोजी ते पत्नीसोबत शेतात घर बांधण्याच्या विचाराने आले होते, पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं.

या हत्येच्या मागे जमिनीचा वाद असल्याचं तपासात समोर आलं आहे. काही वर्षांपूर्वी नामदेव यांनी आरोपींचे वडील, म्हणजे त्यांचे बंधू यांच्याकडून दीड एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, काही वर्षांनंतर आरोपींच्या वडिलांनी ती जमीन परत मागितली, ज्याला नामदेव यांनी नकार दिला होता. याच गोष्टीचा राग आरोपी बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (वय 33) आणि आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (वय 30) या दोघा पुतण्यांच्या मनात खदखदत होता.

या रागातूनच त्यांनी आपल्या चुलत्याच्या हत्येचा कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे, हा कट त्यांनी ‘क्राइम पेट्रोल’ मालिका बघून बेतला होता. ९ मे च्या रात्री जेव्हा नामदेव घरी झोपले होते, तेव्हा या दोघांनी त्यांना ‘चोर आला’ असं सांगून उठवलं. त्यानंतर त्यांना शेतातील विहिरीकडे घेऊन गेले. तिथे एका पुतण्याने नामदेव यांचा गळा आवळला, तर दुसऱ्याने धारदार कोयत्याने त्यांचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह विहिरीत फेकून दिला.

Breaking News: Crime Patrol” Baghoon Putnyani Chulatyachan murder case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here