पती कामावरून घरी आला अन पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह दिसले
Breaking News | Bhiwandi Crime: धक्कादायक घटना समोर आली आहे. पती कामावर गेलेला असताना महिलेने तीन मुलींसह आयुष्य संपवलं.
भिवंडी शहरातील फेणेगाव येथे ही घटना घडली. महिलेने आधी मुलींना फाशी दिली आणि नंतर स्वतः गळफास घेतला. पती कामावरून घरी आल्यानंतर त्याला चौघींचे मृतदेहच दिसले. या घटनेने भिवंडीमध्ये खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरातील फेणेगाव येथे चौघींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (३ मे) समोर आली.
मयतांची नावे कळू शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, घरात महिला आणि एक १२ वर्षांची, एक ६ वर्षांची आणि एक ४ वर्षांची मुलगी होती. महिलेचा पती रात्रपाळीत काम करतो.
पती रात्रपाळीच्या कामावर गेल्यानंतर चौघींनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पती सकाळी ९ वाजता घरी आला. तेव्हा त्याला घरात चौघी मृतावस्थेत दिसल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. महिला आणि मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. महिलेने तीन मुलींसह आत्महत्या का केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Breaking News: Dead bodies of husband, wife and three daughters found at home