Home संगमनेर संगमनेर: सभामंडपात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेर: सभामंडपात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Breaking News | Sangamner: तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील शिवमंदिर भवनाच्या सभामंडपात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Dead body of young man found in assembly hall

संगमनेर: तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील शिवमंदिर भवनाच्या सभामंडपात तरुणाचा रविवारी (दि,12) सकाळी 7 वाजता मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (वय 31, रा. मूळ रा. जांभुळबन, ता. राहुरी, हल्ली रा. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शिवमंदिर भवनाच्या सभामंडपात मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शिवाजी विठ्ठल बाचकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोना. डी. एम. चौधरी हे करत आहे.

Breaking News: Dead body of young man found in assembly hall

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here