अहिल्यानगर: बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेला मृतदेह एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला
Breaking News: | Ahilyanagar : महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला.
श्रीरामपूर: गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे.
महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला.
गणेश विसर्जन सुरू असतानाच ही धक्कादायक घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह इतका कुजलेल्या अवस्थेत होता की, तो ओळखणे पोलिसांसाठीही अत्यंत अवघड होते. तब्बल चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शीर धडापासून वेगळे झाले होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे तसेच शीर धडापासून वेगळे झाल्याने या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, ही आत्महत्या की घातपात याचाही तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे महेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील तपासातूनच या घटनेमागील खरे कारण समोर येईल.
Breaking News: decomposed body of a missing young man was found in a locked