Home संगमनेर संगमनेर शहरात फलकबाजीची चर्चा, नेमकं काय आहे प्रकरण

संगमनेर शहरात फलकबाजीची चर्चा, नेमकं काय आहे प्रकरण

Breaking News | Sangamner: आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Discussion of billboards in Sangamner city

संगमनेर: शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या फलकबाजीने विद्रपीकरण झाले. मात्र स्वच्छ व सुंदर संगमनेर ही संकल्पना ठळक करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यावर कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतः चे फलक काढून त्यांनी एक चांगला पायंडा घातला आहे.

सदर निवेदनात त्यांनी म्हटले की, संगमनेर हे केवळ शहर नाही तर ती आपली संस्कृती व ओळख आहे. अत्यंत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या जनतेचे हे घर आहे. १९९१ मध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराचे नेतृत्व करत शांतता निर्माण केली. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरात सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून वैभवशाली बनवले. दुर्गा तांबे यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. एक विकसित, शांत, सुरक्षित आणि विश्वासार्ह असलेले शहर म्हणून संगमनेरचा लौकिक निर्माण झाला. मात्र मागील काही दिवसांपासून खूप फलकबाजी होत आहे.

शहरात अवैध फलकांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून नाईलाजाने मलाही कधीकधी या स्पर्धेत उतरावे लागले. परंतु तमाम संगमनेरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे सर्व फलक तातडीने काढावे ही विनंती

आहे. शहराच्या दर्शनी भागात, चौकात, बसस्थानक, मोठमोठ्या इमारती, एवढेच काय तर मंदिर व धार्मिक स्थळांचे सौंदर्य सुद्धा या फलकांमुळे झाकाळून गेले आहे. कमानींवर कमानी फलकांवर फलक लावून सर्वत्र गोंधळ निर्माण केला आहे. यातून राजकीय वाद व तणाव वाढत असून फलक फाडण्याचे प्रकार सुद्धा सुरू झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शांत व सुसंस्कृत वातावरण बिघडत चालले आहे. त्यामुळे हे फलक काढून टाकावे. याचबरोबर मी स्वतः तत्काळ माझे सर्व फलक काढून टाकत असून प्रशासनाने तातडीने सर्व अनधिकृत फलक काढावे, असे आवाहन केले आहे.

संगमनेर हायटेक बसस्थानक पूर्ण केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्या परिसरामध्ये फलक लावलेले होते. त्यावर तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः उतरून सर्व स्वतःचे फलक काढून टाकण्याच्या सूचना दिल्या व बसस्थानक परिसर अत्यंत मोकळा व स्वच्छ केला. या कृतीचे राज्यभर कौतुक होऊन इतरांसाठी दिशादर्शक ठरले होते. याच धर्तीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सुद्धा स्वतःचे सर्व फलक काढून इतर कार्यकर्त्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

Breaking News: Discussion of billboards in Sangamner city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here