Home संगमनेर संगमनेरात जिल्हा न्यायालयाच्या शिपायाला बेदम मारहाण

संगमनेरात जिल्हा न्यायालयाच्या शिपायाला बेदम मारहाण

Breaking News | Sangamner Crime: एका शिपायाला किरकोळ कारणावरून हॉकीस्टिकने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत.

District Court constable brutally beaten up in Sangamner

संगमनेर: शहरातील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या एका शिपायाला किरकोळ कारणावरून हॉकीस्टिकने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. ही घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ६.२१ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की न्यायालयातील शिपाई प्रवीण शंकर वेडे (वय ३३) हे आपल्या दुचाकीने जात असताना मालदाड रोड येथे आरोपी वैभव दिलीप बुरकुल (रा. मालदाड रोड, संगमनेर) आणि त्याचा साथीदार रोहित दारोळे (पत्ता अपूर्ण, रा. बुद्धविहार जवळ, संगमनेर) यांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून धक्का दिला. त्यावरून वाद वाढल्याने आरोपींनी वेडे यांना शिवीगाळ करत तोंडावर चापटी मारली. तसेच डोळ्याजवळ आणि छातीवर मारहाण केली. विरोध केल्यावर आरोपींनी कमरेपासून लोखंडी वस्तू (हॉकीस्टिक) काढून वेडे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी प्रवीण वेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भांगरे हे करत आहे.

Breaking News: District Court constable brutally beaten up in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here