डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
Breaking News | Sangamner: डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तब्बल ३९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
संगमनेर: रविवार दि. ७ सष्टेंबर २०१५ रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे पार पडलेल्या अक्षरशिल्प पामा इंडिया ॲबॅकस अँड ॲरीथमॅटीक रिजनल कॉम्पिटिशन २०२५ या स्पर्धेत डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडियम स्कूल व जूनियर कॉलेज, संगमनेर च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तब्बल ३९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
याआधी नवी मुंबई येथे झालेल्या मेंटल मॅथ्स वर्ल्ड चॅम्पियन शिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला शाळेचा विद्यार्थी देवांग पठाडे याने 100 डॉलर्स चे बक्षीस मिळवले व मलेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल पामा ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये त्याची निवड झाली आहे.
आणि आता मालपाणी हेल्थ क्लब येथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा शाळेतील विद्यार्थी देवांग पठाडे तसेच आर्या झावरे, यथार्थ शुक्ला, हसनैन सय्यद, दूर्वा परचंडे, अंश अरगडे यांनी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन या गटात तर ऋग्वेद कानवडे, प्रत्यूष थोरात, दक्ष भरीतकर, अंकिता शिंदे, करण ढोमसे यांनी चॅम्पियन स्टुडंट्स या गटात बक्षिसे पटकावली.
कृष्णा थोरात, पूर्वी साळवे, अद्वैत आचारी, ऋषभ इंदुलकर, धानी पुरोहित, अमृता लेनेकर, सिद्धार्थ वाकचौरे, वृंदा पुंड , सृष्टी मैंन्दरे विद्यार्थ्यांनी फर्स्ट रँक मिळवली तर अथर्व मोरे, पुष्कर पाडेकर, अलोक थोरात, अनुष्का कलापूरे, अंश सोर, ध्रुविका अग्रवाल, सिद्धी अग्रवाल, यांनी सेकंड रँक मिळवली. श्लोक कर्डिले, प्रेम मुके, आराध्या पुंड, रिद्धिश अनाप, तनिष्का अनाप, आश्रय मैड, ईश्वरी श्रीखंडे, रिद्धी उनवणे, या विद्यार्थ्यांनी थर्ड रँक मिळवली. या सर्व विद्यार्थ्यांची निवड नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रिय ॲबॅकस स्पर्धेसाठी झालेली आहे.
जयेश थिटमे, युवराज डोंगरे, शांभवी मुटके, बतूल सिद्दिकी, ओवी ताजने, आरोही निळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
सर्व विद्यार्थ्यांची तयारी त्यांच्या शिक्षिका इंटरनॅशनल सर्टिफाईड ॲबॅकस टीचर सोनाली पठाडे मॅडम (देवांग क्रिएशन संगमनेर, फ्रॅन्चाइझी पामा इंडिया), मंगल कानवडे मॅडम, वर्षा दारोळे मॅडम, व प्रिन्सी मिश्रा मॅडम यांनी करून घेतली होती तसेच पामा इंडिया चे संस्थापक आबाजी काळे सर आणि अक्षरशिल्प च्या डायरेक्टर शिल्पा काळे मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ.अंकिता श्रीराज डेरे मॅडम, प्राचार्य श्री. सुनीलकुमार शुक्ला सर, तसेच उपप्राचार्या ( प्राथमिक विभाग ) स्मिता गुंजाळ मॅडम यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले तसेच संगम सेवाभावी संस्थेच्या विश्वस्थ मंडळाकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
Breaking News: Dr. Bhanudas G. Dere English Medium School has a crown of honor on its head