वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थाची तस्करी ! भाऊ बहिण मिळून करत होते तस्करी
Breaking News | Pune Crime: बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना मॅफेड्रॉन (एम डी) या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे निष्पन्न.
पुणे : बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व येणाऱ्या ग्राहकांना येथील एक आक्काच अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या आक्काला अटक केली होती. बहिण भाऊ मिळून हे रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ज्योती सुनिल यादव ऊर्फ कट्टीमणी (वय ५०, रा. कात्रज) असे या आक्काचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने लक्ष्मी रोडवरील बुधवार पेठेतील बोळात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या शरणप्पा कटिमणी (वय ३४, रा. कात्रज, मुळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) याला पकडले होते. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम मॅफेड्रोन (एम डी) जप्त केले होते. त्याकडे तपास केला असता त्याची बहिण ज्योती यादव हिच्याकडून विक्री करीता पुरवल्याचे निष्पन्न झाले. ती या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असून तीच मागील दोन वर्षांपासून बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना मॅफेड्रॉन (एम डी) या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या आक्काला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, मयुर सूर्यवंशी, साहिल लेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील दिशा खेवलकर, रवींद्र रोकडे यांनी केली आहे.
Breaking News: Drug trafficking under the guise of prostitution